Benchmarks
View scores and output across OCR models spanning many document categories.
Want to run these evals on your own documents?
Talk to SalesIJAAR
Vol.3 No.4
ISSN - 2347-7075
गद्य तसेच मौखिक लोककथांचा प्रभाव त्यांच्या कथांवर आहे. देशी कथनपरंपरेकडे त्यांचा असलेला कलही स्पष्टपणे जाणवतो. वरवरचे पृष्ठस्तरीय वास्तव मांडण्यापेक्षा खोलवरचे गर्भित सूचन करण्याकडे त्यांचा कल आहे. धर्म, जात, लिंग, प्रदेश अशा अस्मिताकेंद्री गोष्टींची दाट छाया पसरलेल्या काळाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्याचे काम या लेखकांनी केले आहे. शोषित, वंचित, कष्टकरी वर्ग त्यांच्या साहित्यातून सातत्याने अवतीर्ण झाला आहे. तसेच या जगाशी त्यांचे आंतरिक नाते आहे. जयंत पवार यांच्या कथासंग्रहाचा विचार करत असताना पार्श्वभूमीदाखल आजच्या कथेसंदर्भातील काही निरीक्षणे नोंदवणे महत्वाचे वाटले. याबरोबरच एक लेखक म्हणून जयंत पवार यांच्या जीवनविषयक वाटचालीचा आढावा घेणे प्रस्तुत शोधनिबंधात गरजेचे वाटते.
कथनातील प्रयोगशीलता व फँटसीचा वापर
जयंत पवार यांच्या कथा कथनाच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पाचही कथांमध्ये याचा प्रत्यय येतो. त्यांच्या कथनाचा महत्त्वाचा विशेष म्हणजे वाचकांना त्यांनी चर्चेच्या अथवा कथनाच्या कक्षेत सतत आणले आहे. कथा वाचत असताना वाचकांची उपस्थिती सतत जाणवत राहते. कथनाच्या अनुषंगाने लक्षणीय विविधता जयंत पवार यांच्या कथेत आहे. वास्तव आणि कल्पिताचा खेळ उभा करत संबंध कथनव्यवहार त्यांनी साकारला आहे. पृष्ठस्तरीय अनुभवद्रव्याचे अनेक कंगोरे उजागर करण्यासाठी ही शैली फायदेशीर ठरली आहे. 'बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य' या पहिल्या कथेमध्ये लेखकास बाबलचे मिथक
प्रा. सागर अशोक लटके
31