Talk to Sales

Benchmarks

View scores and output across OCR models spanning many document categories.

Want to run these evals on your own documents?

Talk to Sales
Page 1

A

7

D11

28. अनुज-अग्रज, ऐच्छिक-अपरिहार्य, कृतज्ञ-कृतघ्न तर शुद्धपक्ष या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता ?

(1) अशुद्धपक्ष (2) वद्यपक्ष (3) कृष्णपक्ष (4) शुक्लपक्ष

29. पुढील वाक्य होकारार्थी वाक्यात परिवर्तित करा -

'पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे.'

(1) पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.
(2) पाचशे रुपयापेक्षा दुसरी मोठी रक्कम नाही.
(3) पाचशे रुपये ही लहान रक्कम आहे.
(4) वरीलपैकी एकही नाही.

30. योग्य पर्याय निवडा -

(a) अ-आ, इ-ई, उ-ऊ, हे सजातीय स्वर आहेत.
(b) अ-इ, अ-उ, इ-ए, हे विजातीय स्वर आहेत.

पर्यायी उत्तरे :

(1) (a) बरोबर आणि (b) चूक (2) (a) आणि (b) दोन्ही बरोबर
(3) (a) आणि (b) दोन्ही चूक (4) (b) बरोबर आणि (a) चूक

31. पुढील शब्दसमूहात न जुळणारा शब्द ओळखा -

(1) चांगुलपणा (2) सैन्य (3) शौर्य (4) विद्वत्ता

32. भलता सलता कोणी तरी या अर्थाचा शब्दसमूह कोणता ?

(1) उपटसुंभ (2) अष्टपैलू (3) अजागळ (4) अक्षरशत्रू

33. बिंदूच्या खणखणीत उच्चारास काय म्हणतात ?

(a) अनुनासिक (b) अनुस्वार (c) विसर्ग (d) स्वर

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त (a) बरोबर बाकी सर्व चूक (2) फक्त (b) बरोबर बाकी सर्व चूक
(3) फक्त (d) बरोबर बाकी सर्व चूक (4) फक्त (c) बरोबर बाकी सर्व चूक

कच्च्या कामासाठी जागा /SPACE FOR ROUGH WORK

P.T.O.

www.mpscmaterial.com follow us @mpscmaterial on FB, INSTA and t.me/mpscmaterial